रोटरी क्लबने उभारलेले स्वच्छतागृह अज्ञाताने तोडले

जालना – प्रतिनिधी
आंत्रप्रेन्युअर सिध्दांत तवरावाला यांची
‘पी शूट इको युरीनल’ नावाची संकल्पना घेऊन जालना शहरात रोटरी क्लब ऑफ जालनाने नागरीकांच्या सोयीसाठी पर्यावरणपुरक स्वच्छतागृहाची उभारणी शनिवारी ( ता. ९) केली आहे. या स्वच्छतागृहाला बांधून चार दिवस होत नाही तर अज्ञात व्यक्तीने स्वच्छतागृह तोडले आहे. अज्ञाता विरोधात सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोटरी क्लब ऑफ जालनाच्या वतीने शहरातील सिंधी बाजार परिसरात हे स्वच्छतागृह उभारण्यात आले. मंगळवारी ( ता. १२) सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने स्वच्छतागृहाचा एक कडापा तोडला आहे. हे लक्षात आल्यानंतर मंगळवारी रात्री उशिरा रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ. दीपक बगडीया यांनी रात्री उशिरा सदर बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.
या घटनेचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल आगळे करत आहे.