दिवसभराच्या महत्त्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या

मोहन चौकेकर
राज ठाकरे माझ्यावर जातीयवादाचा आरोप करतात, त्याला काय आधार आहे? काहीही ठोकून देतात, जे काहीही बोलतात, त्याची नोंद का घ्यायची? शरद पवार यांचा हल्लाबोल
2019 सालच्या विधानसभा निवडणुकीनंतर भाजपासोबत जाण्यासाठी घेतलेल्या बैठकीला शरद पवार आणि गौतम अदानी उपस्थित होते, अजित पवारांचा दावा; शरद पवार म्हणाले; उद्योगपतीच्या मर्जीने राजकारण चालत नाही
आयुष्यात संविधान वाचले नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींना संविधान रिकामं वाटते, रंगावरही बोलतात; काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा नंदुरबारमधून नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल
राजकारणामुळे पवार घराण्यात निर्माण झालेली कटुता दूर होईल असं वाटत नाही; अजित पवारांचे मोठे वक्तव्य ; नितीन गडकरी चांगले, देवाभाऊ दोन पक्ष फोडून पास झाले, सुप्रिया सुळेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला; म्हणाल्या,’तुमसे ये उम्मीद नहीं थी’ ; ईव्हीएम मशिनमध्ये गडबड, मला सतत एका व्यक्तीचा फोन येतोय; निवडणुकीपूर्वी सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याने चर्चांना उधाण
माझं राजकारण वेगळं, महाराष्ट्रात ‘बटेंगे तो कटेंगे’ची गरज नाही; भाजप आमदार पंकजा मुंडे यांचे एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत वक्तव्य ; मी कुठल्याही सभेत असं वक्तव्य केलं नाही; बटेंगे तो कटेंगे वक्तव्यावरुन पंकजा मुंडेंचं स्पष्टीकरण
उद्धवजी ज्यांनी तुमच्या सोबत गद्दारी केली, त्या आमदाराला धडा शिकवण्यासाठी आम्हाला बंडखोरीचा निर्णय घ्यावा लागला, माजी मंत्री राजेंद्र मुळक यांच्या बंडखोरीबाबत काँग्रेस नेते सुनील केदार यांचे स्पष्टीकरण ; सुनील केदार हे मारुतीच्या बेंबीतला विंचू, ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांचा हल्लाबोल
राहुल गांधींनीच मला आणि सुजयला ( विखे )पक्षाबाहेर काढलं, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा गौप्यस्फोट
मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, ‘मुंबई तुमची भांडी घासा आमची’; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं ; मालेगावच्या बँकेत 125 कोटींचा आर्थिक व्यवहार, किरीट सोमय्यांकडून ‘व्होट जिहाद’चा आरोप; आता अनेक धक्कादायक गोष्टींचा उलगडा
धमकी देतोस की काय? मुन्ना, तुझा हात जागेवर ठेवणार नाही मी! उद्धव ठाकरेंचा धनजंय महाडिकांवर सोलापुरातही हल्लाबोल ; मुदाळ तिट्ट्याला आमदार प्रकाश आबिटकरांच्या पोस्टरची फाडाफाडी; आबिटकर म्हणाले, फलक फाडाल पण जनतेच्या मनातून फाडू शकणार नाही!
कोल्हापूर दक्षिणमध्ये कोण मारणार बाजी? महाडिक पाटलांमध्ये पुन्हा एकदा निकराची लढाई
उदगीरमध्ये संजय बनसोडेंसमोर पवार गटाच्या सुधाकर भालेरावांचं आव्हान, कोण मारणार बाजी ?