आपला जिल्हाताज्या घडामोडी

घाणेवाडी येथे पक्षी निरीक्षण आणि स्वछता ही सेवा उपक्रम.

कार्यकारी संपादक : विनोद कोल्हे

संत गाडगेबाबा जलाशय घाणेवाडी येथे पक्षी निरीक्षण आणि स्वच्छता ही सेवा उपक्रम. चौकट घाणेवाडी जलाशय येथे 19 प्रकारच्या पक्षी प्रजातीची नोंद. तलाव परिसरात जवळपास 600 पक्षाचा अधिवास. हिवाळी स्थलांतरित पक्षाने फिरवली पाठ स्थानिक पक्ष्यांची मात्र रेलचेल. अधिवास संवर्धनाची गरज. पक्षी निरीक्षण करताना आढळलेले पक्षी चमचा बदक,हळदीकुंकू बदक,हिरवे कबूतर, पारवा,शेकाट्या,भारद्वाज, पाकोळी, टिटवी, नदीसुरय,मोठा बागळा, मध्यम बगळा, छोटा बगळा राखी बगळा, वंचक, शिंपी पक्षी, खंड्या पक्षी, पानकावळा, तुतवार इत्यादी.

– ज्ञानेश्वर गिराम 

जालना येथील संत गाडगेबाबा जलाशय येथे दिनांक 13 नोव्हेंबर 2024 रोजी भारतीय वन्य जीव संस्थान एनआरसीडी देहरादून, महाराष्ट्र पक्षी मित्र संघटना आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा जालनाच्या वतीने पक्षी निरीक्षण  स्वच्छता ही सेवा आणि पर्यावरण संवर्धन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी जीवनराव पारे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त असा सहभाग नोंदविला. 

याप्रसंगी सुरुवातीला पक्षी निरीक्षण करून तलावा च्या परिसरात आढळणाऱ्या विविध पक्षांच्या प्रजातींची नोंद घेण्यात आली विद्यार्थ्यांनी कॅमेरा आणि दुर्बिणीच्या साह्याने प्रत्यक्ष पक्षी पाहण्याचा आनंद घेतला याप्रसंगी वन्यजीव अभ्यासक , पक्षी मित्र ज्ञानेश्वर गिराम यांनी विविध पक्षांचा अधिवास, त्यांची रचना आणि त्यांचे निसर्गातील स्थान तसेच पक्षी निरीक्षण कसे करावे आणि काय काळजी घ्यावी याविषयी सविस्तर माहिती दिली. 

भारतीय वन्यजीव संस्थान चे इकॉलॉजिस्ट अजय गायकवाड यांनी जलीय पर्यावरण संतुलन आणि स्वच्छता याविषयी मार्गदर्शन केले.नदी अभ्यासक  मनोहर सरोदे यांनी जलीय प्रदूषणाची कारणे आणि उपाय योजना याविषयी माहिती दिली.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रधान सचिव मधुकर गायकवाड यांनी परिसंस्थेतील अन्नसाखळी विषयी माहिती दिली. 

आमच्या व्हाटसअप ग्रुप ला जॉइन व्हा

त्याचप्रमाणे सर्पमित्र मयूर साबळे यांनी सर्प पर्यावरणाचा महत्त्वाचा घटक याविषयी सविस्तर माहिती दिली.  

मुख्याध्यापक सुभाष पारे यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण स्वच्छतेची शपथ दिली. 

याप्रसंगी वन्यजीव अभ्यासक पक्षी मित्र ज्ञानेश्वर गिराम, भारतीय वन्यजीव संस्थान चे पर्यावरण तज्ञ  अजय गायकवाड,महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रधान सचिव  मधुकर गायकवाड,  मनोहर सरोदे,  माया गायकवाड,  सुभाष पारे,  नारायण राजे भोसले,  मयूर साबळे,  उमेश पवार यांच्यासह जीवनराव पारे विद्यालय चंदनझिरा जालना येथील जवळपास 40 विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा.ग्रुप मध्ये पोस्ट करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!