आपला जिल्हा

जालना जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात  पाच वाजेपर्यंत 64.17 टक्के मतदान  

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024

जालना, प्रतिनिधी

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने जालना जिल्ह्यातील 99-परतूर, 100-घनसावंगी, 101-जालना, 102-बदनापूर आणि 103-भोकरदन या विधानसभा मतदारसंघातील 1 हजार 755 मतदान केंद्रांवर आज मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत मतदान पार पडले. सायंकाळी 5 वाजेपर्यंत 64.17 टक्के मतदान झाले आहे. 

आज पार पडलेल्या मतदान प्रक्रियेनुसार सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघनिहाय झालेले मतदान टक्केवारी पुढील प्रमाणे आहे. यामध्ये 99-परतूर 62.06 टक्के, 100-घनसावंगी 66.57 टक्के, 101-जालना 59.12 टक्के, 102-बदनापूर 65.22 टक्के आणि 103-भोकरदन 68.15 टक्के असे एकूण सरासरी 64.17 टक्के मतदान झाले होते. मतदानाची सायंकाळी 5 ते 6 वाजेपर्यंतची म्हणजेच मतदान संपेपर्यंतची आकडेवारी अद्याप प्राप्त व्हायची आहे. 

विधानसभा मतदार संघातील काही अनेक ठिकाणी मतदानाची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरु होती. पाचही विधानसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी मतदारांनी उस्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी सर्व मतदारांचे आभार मानल. 

शेअर करा.ग्रुप मध्ये पोस्ट करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!