ताज्या घडामोडी
जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क

जालना ,प्रतिनिधी
लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावे असे आवाहन करीत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि त्यांच्या पत्नी अश्विनी पांचाळ यांनी जालना येथील मत्स्योदरी महाविद्यालय येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला.
यावेळी डॉ. पांचाळ यांनी मतदान केंद्रातील केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांच्याशी संवाद साधुन मतदान प्रक्रियेबाबतची माहिती घेतली. तसेच मतदानासाठी आलेल्या मतदारांशी देखील त्यांनी संवाद साधत मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी मतदारसंघातील विविध मतदान केंद्रावर युवा मतदारासह ज्येष्ठ मतदार आणि महिला मतदारांनी देखील उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावला.