केरला पब्लिक स्कूल या शाळेत संविधान दिन साजरा.

कार्यकारी संपादक : विनोद कोल्हे
केरला पब्लिक स्कूल आणि व्हिजन इंग्लिश स्कूल येथे संस्थेचे अध्यक्ष विलास सावंत पाटील यांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून 75 वा संविधान दिन साजरा करण्यात आला.भारताची राज्यघटना, भारताचा सर्वोच्च कायदा आहे.26 जानेवारी 1950 राज्य घटना अस्तित्वात आली. या प्रक्रियेस 2 वर्ष, 11 महिने आणि 18 दिवस लागले.महिती मुलांना सांगितली आणि सर्व मुलांनी व शिक्षकांनी संविधान म्हटले.मुलांची वेशभुषा करुन संविधानाचे न्याय, समानता, बंधुता, स्वतंत्रता याचे महत्त्व पटवून दिले.26/11 आतंकवादी हल्यामध्ये शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी शाळेच्या मुख्यध्यापिका शिल्पा तुम्मा, सविता झोरे, कीर्ती गोरे, दिपाली मगरे, वृषाली काटकर, उज्वला देशमुख, विद्या मिसाळ, किरण नाटकर, शुभम भंडारी, सुभाष क्षीरसागर उपस्थित होते.