विठ्ठल प्राथमिक शाळेत संविधान दिन उत्साहात साजरा.

कार्यकारी संपादक : विनोद कोल्हे
विठ्ठल प्राथमिक व माध्यमिक शाळेत संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला .यावेळी कार्यक्रमाला अध्यक्षा म्हणून लाभलेल्या शाळेच्या मुख्याध्यापिका शुभांगी येमूल या उपस्थित होत्या. तर प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून लाभलेले शाळेचे शिक्षक जी. पी .शंकर उपस्थित होते. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी संविधान दिनानिमित्त भाषणे तसेच शायरी प्रस्तुत केली. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा शुभांगी येमूल यांनी विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्त्व याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून लाभलेले जी. पी. शंकर यांनीही विद्यार्थ्यांना संविधानाविषयी सखोल अशी माहिती दिली . या कार्यक्रमाचे संचालन शाळेचे शिक्षक व्ही.के.फराटे यांनी केले. तर शेवटी मान्यवरांचे आभार शाळेच्या शिक्षिका सी. ए. सामल यांनी मानले. सदरील कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका एस.एन.येमुल तसेच केले यावेळी शिक्षकेत्तर कर्मचारी,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते..