महाराष्ट्र

पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनी राज्यात 10 हजार पत्रकारांची आरोग्य तपासणी 

मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचेकडून आरोग्य तपासणी यंत्रणेचे ऋणनिर्देश

मोहन चौकेकर

मराठी पत्रकार परिषदेच्या ८६ व्या वर्धापन दिनानिमित्त आज मंगळवारी राज्यभरात विविध जिल्हे, तालुक्यांमध्ये “पत्रकार आरोग्य तपासणी शिबिरांचे” आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळाला असून राज्यात तब्बल ९५०० पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. तर, काही जिल्ह्यांमध्ये पत्रकारांसाठी आरोग्य शिबिर हे पुढील तीन ते चार दिवसांमध्ये होणार आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी ११ हजार पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्याचा परिषदेने केलेला संकल्प नक्कीच पूर्ण होईल, असा विश्वास परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केला.

मराठी पत्रकार परिषदेची स्थापना ३ डिसेंबर १९३९ रोजी मुंबईत झाली. गेली अकरा वर्षे परिषदेच्या वतीने 3 डिसेंबर हा दिवस राज्यात “पत्रकार आरोग्य तपासणी दिवस” म्हणून साजरा केला जातो. राज्यात ३६ जिल्हे आणि ३५४ तालुक्यात परिषदेच्या शाखा आहेत. यातील बहुसंख्य जिल्हे आणि तालुक्यात रविवारी आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. यामध्ये पुणे, अहिल्यानगर, बीड, गडचिरोली, रायगड, मुंबई, धुळे, ठाणे, नाशिक, जळगाव, धुळे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, अकोला, बुलढाणा अमरावती, यवतमाळ, रत्नागिरी, नांदेड, परभणी यासह विविध जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्यभर शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाल असून तब्बल ९५०० पत्रकारांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. तर, राज्याच्या काही भागामध्ये पुढील तीन ते चार दिवसांमध्ये पत्रकारांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यामुळे यावर्षी ११ हजार पत्रकारांच्या आरोग्य तपासणी करण्याचा परिषदेने केलेला नक्कीच पूर्ण होईल, असा विश्वास एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केला. राज्याच्या विविध भागात पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिर यशस्वी केल्याबद्दल परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्यासह विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, अध्यक्ष मिलिंद अष्टिवकर, कार्याध्यक्ष शिवराज काटकर, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे,कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख, राज्य प्रसिद्धीप्रमुख संदीप कुलकर्णी, डिजिटल मीडिया परिषदेचे अध्यक्ष अनिल वाघमारे यांनी राज्यातील सर्व जिल्हा पत्रकार संघ, तालुका पत्रकार संघाचे अभिनंदन केले आहे. तसेच मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त राज्यातील सर्व पत्रकारांना शुभेच्छा दिल्या आहेत.

अहिल्यानगर येथे पथनाट्य व जनजागृती रॅली- मराठी पत्रकार परिषदेच्या अहिल्यानगर जिल्हा शाखेने यंदा आरोग्य तपासणी शिबिर डॉ.विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल हॉस्पिटलच्या सहकार्याने घेतले. यावेळी एड्स विषयक जनजागृती करण्यासाठी जनजागृती रॅली काढण्यात आली. तसेच एड्स विषयक जनजागृती पथनाट्य सादर करण्यात आले. योग विषयक पत्रकारांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पत्रकारांना हिवाळ्यात उपयोगी पडेल असे मेडिकल किटचे मोफत वाटप करण्यात आले. जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके, डिजिटल मीडिया परिषदेचे आफताब शेख यांनी हे शिबिर यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. या शिबिराला मा.खासदार डॉ.सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, डॉ.विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल कॉलेजचे संचालक डॉ.अभिजित दिवटे यांनी शुभेच्छा देत मराठी पत्रकार परिषदेच्या उपक्रमाचे कौतुक केले. जिल्हा माहिती अधिकारी डॉ.किरण मोघे, डॉ.विठ्ठलराव विखे पाटील हॉस्पिटलचे मेडिकल सुपरीडेंट डॉ. सतीश मोरे यांच्या हस्ते या शिबिराचे उदघाटन झाले. 

शेअर करा.ग्रुप मध्ये पोस्ट करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!