चंदनझिरा : सिद्धिविनायक नगर भागातील नागरिकांच्या घरात सांडपाणी शिरत असल्याने जालना महापालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांना निवेदन देण्यात आले.

कार्यकारी संपादक: विनोद कोल्हे
चंदनझीरा : येथील सिद्धिविनायनगर भागात सांडपाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे रोड व नाल्या तयार झाल्या असून सांडपानी जाण्यासाठी मार्ग नसल्याने हे सांडपाणी येथील रहिवासांच्या घरात घुसत आहे. सिद्धिविनायक नगर भागातील नागरिकांनी मंगळवार रोजी जालना महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सांडपाणी जाण्यासाठी मार्ग नसल्याने परिसरातील नागरिकांना डासांचा व रोगराईचा सामना करावा लागत आहे पालिकेने तात्काळ कारवाई करून आमच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून जालना महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांची भेट घेतली आहे.यावेळी प्रभागातील माजी नगरसेवक सतीश जाधव , जगन्नाथ चव्हाण , प्रल्हाद देठे विठ्ठल लोंढे , जयंत बुरा, आप्पासाहेब नेमाने , गजानन डबे , ज्ञानेश्वर येवले , भिकन मस्के , सदाशिव मोरे , राजेंद्र कोल्हे तसेच परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.