जीवनराव पारे शाळेत शालेय क्रीडा सप्ताहाचा समारोप मोठया उत्साहात .

कार्यकारी संपादक : विनोद कोल्हे
दिनांक18 डिसें चंदनझिरा येथील जीवनराव पारे विद्यालयात शालेय शिक्षण व क्रीडा विभाग , क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद जालना यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित क्रीडा सप्ताह याचा समारोप जीवनराव पारे विद्यालय येथे मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती डॉ.रेखा परदेशी मॅडम श्री ( क्रीडा अधिकारी जालना) प्रमुख पाहुणे मा. श्री प्राध्यापक हेमंत वर्मा (नॅशनल धनुर्विद्या कोच जे एस कॉलेज जालना,) तसेच उपस्थित मान्यवर मध्ये मा.श्री सिद्धार्थ कदम (जिम्नॅस्टिक क्रीडा मार्गदर्शक )श्रीमती डॉ. रेखा परदेशी (तालुका क्रीडा अधिकारी)श्रीमती आरती चिल्लारे, श्रीमती प्रतिमा मसोले (क्रीडा शिक्षिका ),श्री. अमर लोढे (क्रीडा शिक्षक ), श्री. निसार सर (क्रीडा शिक्षक )हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. दिनांक 12 डिसेंबर ते 18 डिसेंबर या कालावधीमध्ये हा क्रीडा सप्ताह पार पडला .त्यानंतर शाळेच्या वतीने मान्यवरांचे स्वागत सत्कार करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती डॉ.रेखा परदेशी मॅडम यांनी केले. शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध शालेय खेळात बुद्धिबळ,खो -खो, थ्रो बॉल, व्हॅलीबॉल, दोरिवरच्या उड्या अश्या खेळात 350विद्यार्थी सहभागी झाले.विजेत्या खेळाडूंना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देण्यात आले. यानंतर मेजर ध्यानचंद यांच्या कार्याची आणि हॉकी डॉ. श्रीमती रेखा मॅडम यांनी खेळाविषयीची माहिती आपल्या भाषणातून व्यक्त केली .त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री प्राध्यापक हेमंत वर्मा सर यांनी खेळाविषयी मोलाचे मार्गदर्शन शाळेतील विद्यार्थ्यांना केले .श्रीमती आरती खिल्लारे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना खेळातील संघटन ,चिकाटी, नेतृत्व ,हे गुण आपल्या दैनंदिन आयुष्याला आकार देण्याचे काम करत असतात. क्रीडा मार्गदर्शक मा. श्री सिद्धार्थ कदम यांनी देखील मनोगत व्यक्त केलं खेळ आणि व्यायाम यांचा य मिलाप घातल्या गेल्यानंतर आयुष्य आनंदी आणि शरीर देखील सुदृढ राहते आणि यानंतर या सगळ्या गोष्टीचा आपल्या शैक्षणिक जीवनात आपल्याला याचा नक्कीच फायदा होतो. कार्यक्रमाचे अध्यक्ष क्रीडा अधिकारी जालना यांनी अध्यक्षीय भाषण करत असताना विद्यार्थ्याने नियमित आपल्या आवडीची खेळ खेळले पाहिजे खेळातून शरीरामध्ये लवचिकता निर्माण होते आणि संघटन कौशल्य अभ्यासामध्ये चिकाटी आणि मन केंद्रित करणे खेळातून शक्य होते याबद्दल माहिती दिली. याप्रसंगी शाळेचे शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.विजय खंडीभराड सर यांनी केले आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुभाष पारे सर यांनी केले..