महाराष्ट्र

महायुतीच्या 39 मंत्र्यांनी घेतली मंत्रीपदाची शपथ, 4 लाडक्या बहिणींना संधी, चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे, अतुल सावे, संजय शिरसाठ, आकाश फुंडकर आदींचा समावेश 

मोहन चौकेकर

नागपूर येथील राजभवनवर राज्यपाल राधाकृष्णन यांनी सर्वच मंत्र्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. त्यामध्ये, 33 कॅबिनेटमंत्री तर 6 राज्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा संपन्न झाला. राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात 4 लाडक्या बहिणींना संधी देण्यात आली आहे. पंकजा मुंडेंसह आदिती तटकरे यांना दुसऱ्यांदा संधी मिळाली आहे. तर, मेघना बोर्डीकर आणि माधुरी मिसाळ हे दोन नवे चेहरे मंत्रिमंडळात आले आहेत.

राज्यातील महायुती सरकारमधील 39 मंत्र्यांचा शपथविधी आज नागपूर येथील राजभवनमध्ये संपन्न झाला. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व अजित पवार यांचा शपथविधी मुंबईत संपन्न झाला होता. त्यानंतर, सर्वांचं लक्ष लागलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराच मुहूर्त अखेर आज संपन्न झाला. त्यानुसार, 4 लाडक्या बहिणींसह 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यामध्ये 33 कॅबिनेट मंत्री तर 6 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी राज्यपाल राधाकृष्णन यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अनेक दिग्गज नेते व्यासपीठावर होते. महाराष्ट्र देशाभरातील अनेक राजकारणी मंडळी व अनेक मान्यवर मंडळी मंत्रिमंडळा विस्तार सोहळ्याला उपस्थित होती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसासह एकूण 42 मंत्री

राज्यातील महायुती सरकारमध्ये मुख्यमंत्री, दोन उपख्यमंत्री आणि 39 मंत्री असे एकूण 42 मंत्र्यांचा शपधविधी संपन्न झाला आहे. राज्याती मंत्रिमंडळातील मंत्र्यांची संख्या 43 आहे, त्यामुळे, अद्यापही एक जागा शिल्लक असल्याचे पाहायला मिळते. दरम्यान, 42 मंत्र्यांमध्ये 4 महिला नेत्यांना संधी देण्यात आली आहे. तर, 39 कॅबिनेट व 6 राज्यमंत्री आहेत. अद्याप खातेवाटप झालेलं नाही. त्यामुळे, नेमकं कोणत्या मंत्र्यांना कोणतं खातं मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

4 लाडक्या बहिणींना संधी, भाजपच्या तीन

महायुती सरकारमध्ये लाडक्या बहिणींना मंत्रिपदाची संधी मिळणार असे सांगितले जात होते. त्यानुसार, आज 4 लाडक्या बहिणींना मंत्रिपदाची संधी मिळाली असून 2 नवे चेहरे मंत्रिमंडळात सहभागी झाले आहेत. त्यामध्ये, पर्वत मतदारसंघातून विजयी झालेल्या भाजप आमदार माधुरी मिसाळ यांना राज्यमंत्रीपदी संधी देण्यात आली आहे. तर, परभणी जिल्ह्याील जिंतूर मतदारसंघाती भाजप नेत्या मेघना बोर्डीकर यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. याशिवाय, भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीच्या आमदार आदिती तटकरे यांनी दोन्ही अनुभवी महिला नेत्यांनी दुसऱ्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामध्ये, आदिती तटकरे यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे. एकूण, 4 लाडक्या बहिणींना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले असून भाजपकडून 3 आणि राष्ट्रवादीकडन 1 महिला नेत्यांना संधी मिळाली आहे. तर, शिवसेना शिंदे गटाकडून एकही महिला नेत्यांस संधी मिळाली नाही.

आमच्या व्हाटसअप ग्रुप ला जॉइन व्हा

शिवेेंद्रराजे भोसले, नितेश राणे, संजय शिरसाट , आकाश फुंडकर , योगेश कदम यांसह अनेकांना पहिल्यांदाच संधी

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात यंदा तिन्ही पक्षांनी नव्या चेहऱ्यांना प्राधान्याने संधी दिली आहे. त्यामध्ये, भाजपने साताऱ्यातून शिवेंद्रराजे भोसले यांना संधी दिली असून कणकवलीतून नारायण राणेपुत्र आमदार नितेश राणे यांनाही संधी मिळाली आहे. तसेच, पहिल्यांदाच आमदार बनललेल्या योगेश कदम यांनाही शिवसेनेनं मंत्री करुन कोकणात आपलं स्थान बळकट करण्याचा प्रयत्न केला आहे. योगेश कदम हे शिवसेना नेते रामदास कदम यांचे सुपुत्र आहेत. यांसह अनेक नव्या चेहऱ्यांना पहिल्यांदाच मंत्रिमंडळात स्थान मिळालं असून पुण्यातून माधुरी मिसाळ आणि मेघना बोर्डीकर या लाडक्या बहिणींनाही मंत्रीपदाची संधी मिळाली आहे.

मतदारसंघात जल्लोष, फटाके फोडून व पेढे वाटून आनंद

नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना ज्या जिल्ह्यातील नेत्यांना मंत्रीपदाची संधी मिळाली, त्या जिल्ह्यात समर्थकांनी व कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केल्याचं पाहायला मिळालं. त्यात, बीड जिल्ह्यात दोन नेत्यांना विशेष म्हणजे धनंजय मुंडे व पंकजा मुंडे या दोन मुंडेंना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. पंकजा मुंडेंच्या शपथविधीवेळी गोपीनाथ मुंडेंच्या नावाने घोषणाबाजी करण्यात आली. तर परळी
मतदारसंघात भाजप कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. यांसह पहिल्यांदाच मंत्रिपदाची संधी मिळालेल्या नव्या चेहऱ्यांच्या मतदारसंघातही कार्यकर्त्यांचा उत्साह आणि आनंद पाहायला मिळाला. संभाजीनगरचे पुर्व मतदारसंघाचे आमदार संजय शिरसाट यांना त्यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्याने संभाजीनगर मध्ये क्रांती चौक, गुलमंडी, कौकणवाडी यासह संभाजीनगरमधील विविध भागात फटाके फोडून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. खामगावचे आमदार आकाश फुंडकर यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्याने खामगाव व बुलढाणा येथे विविध ठिकाणी फटाके फोडून व पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला .

मंत्रिमंडळामध्ये आज खालील 39 मंत्री महोदयांनी घेतली शपथ

कॅबिनेट मंत्री
1.चंद्रशेखर बावनकुळे
2.राधाकृष्ण विखे पाटील
3.हसन मुश्रीफ
4.चंद्रकांत पाटील
5.गिरीश महाजन
6.गुलाबराव पाटील
7.गणेश नाईक
8.दादाजी भुसे
9.संजय राठोड
10.धनंजय मुंडे
11.मंगलप्रभात लोढा
12.उदय सामंत
13.जयकुमार रावल
14.पंकजा मुंडे
15.अतुल सावे
16.अशोक उईके
17.शंभूराज देसाई
18.आशिष शेलार
19.दत्तात्रय भरणे
20.अदिती तटकरे
21.शिवेंद्रराजे भोसले
22.माणिकराव कोकाटे
23.जयकुमार गोरे
24.नरहरी झिरवाळ
25.संजय सावकारे
26.संजय शिरसाट
27.प्रताप सरनाईक
28.भरत गोगावले
29.मकरंद पाटील
30.नितेश राणे
31.आकाश फुंडकर
32.बाबासाहेब पाटील
33.प्रकाश आबिटकर

राज्यमंत्री

34. माधुरी मिसाळ
35. आशिष जयस्वाल
36. तुषार राठोड
37. मेघना बोर्डीकर

38. इंद्रनील नाईक
39. योगेश कदम

शेअर करा.ग्रुप मध्ये पोस्ट करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!