व्हिजन इंग्लिश स्कूल येथे राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी.

कार्यकारी संपादक: विनोद कोल्हे.
व्हीजन इंग्लिश स्कूल आणि केरला पब्लिक स्कूल, सिद्धिविनायक नगर चंदनझिरा जालना येथे राष्ट्रमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी शाळेचे अध्यक्ष विलास सावंत सर, उपाध्यक्षा लता सावंत , प्रमुख पाहुणे राधाकिसन कदम, मराठा मावळा संघटनेचे अध्यक्ष रमेश तुपे पाटील, शिक्षिका उज्वला देशमुख, विद्या मिसाळ, सविता जोरे, कीर्ती गोरे, दिपाली मगरे, कविता मिश्रा, किरण नाटकर, शिक्षक शुभम भंडारी, सुभाष क्षीरसागर, राहुल धांडे, शिक्षकेत्तर कर्मचारी वर्षा फोके, अंजना अंभोरे, मीरा तायडे उपस्थित होते. राष्ट्रमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेसमोर राधाकिसन कदम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. या वेळी शाळेतील विध्यार्थिनी कुमारी ख़ुशी हिने राजमाता जिजाऊ यांची सुंदर अशी वेशभूषा धारण केली होती.