रामदास आठवलेंच्या वाढदिवसाच्या निमित्त वृद्धाश्रमात कपडे व धान्य वाटप

मोहन चौकेकर
चिखली :- केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या वाढदिवसा निमित्त तुकाराम आश्रय वृद्धाश्रमातील वृद्धाना कपडे व धान्य वाटप करण्यात आले.
ऋणानुबंध समाज विकास संस्था चिखली द्वारा संचालित मानवसेवा प्रकल्प अंतर्गत विना अनुदानित तुकाराम आश्रय वृद्धाश्रम, भोकर ता चिखली जिल्हा बुलडाणा येथे निराधार बेघर वयोवृद्ध आजी आजोबा यांची निःस्वार्थ पणे गेल्या दोन वर्षांपासून सर्व प्रकारे मोफत सेवा देणे सुरु आहे. हि सेवा दानवीर लोकांनी दिलेल्या दानावर सुरु असल्याने येथील निराधार वृद्धाच्या सेवे करीता केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या वाढदिवसाच्या निमित्त रिपाई बुलडाणा जिल्हा व चिखली तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांनी धान्य व कपडे वाटप करून एक प्रकारे सेवा दिली आहे. यावेळी कार्यक्रम चे अध्यक्षसौं वंदना ताई वाघ जिल्हा अध्यक्षा महिला आघाडी तर प्रमुख मार्गदर्शक प्रा मुक्तार खान पठाण हे होते. तर प्रमुख उपस्थिती मध्ये चिखली तालुका अध्यक्ष हिम्मतरावं जाधव, ता उपाध्यक्ष फकिरा निकाळजे प्रकाश पाटील म्हस्के दीपक साळवे हे होते.
निराधारांची सेवा म्हणजे खरे पुण्यांचे काम असून या सामाजिक कार्याला हातभार लावण्यासाठी दान शूर व्यक्ती नि समोर आले पाहिजे असे मत प्रा मुक्तार पठाण यांनी केले. तसेच रिपाई चिखली तालुक्याच्या वतीने आज निराधारांसाठी छोटीशी मदत देत आहोत परंतु भविष्यात माझ्या संपर्कातील दात्याच्या माध्यमातून वृद्धाश्रमाला शक्य ती मदत करण्यात येईल व नामदार रामदास आठवले यांच्याकडुन काही मदत मिळेल या साठी प्रयत्न करू असे हिम्मतरावं जाधव यांनी आश्वासन दिले. यावेळी विजय गायकवाड, विशाल गवई, मच्छिन्द्र मघाडे, रमेश साळवे उमरसिंग सुरडकर, कमलबाई सुरडकर, उषा इंगळे, रुपाली कांबळे, रचना जाधव, मीरा जैस्वाल, अर्चना बोर्डे यांची उपस्थिती होती. रिपाई च्या वतीने निराधार बेघर वयोवृद्ध यांच्या सेवेकरिता धान्य व किराणा वाटप केल्याबद्दल आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार प्रदर्शन वृद्धाश्रमाचे संचालक प्रशांत डोंगरदिवे व संचालिका रुपाली ताई डोंगरदिवे यांनी केले.