ताज्या घडामोडी

राष्ट्रीय गणित दिवस विशेष द मॅन हू न्यू इन्फिनिटी ..

राष्ट्रीय गणित दिवस विशेष
द मॅन हू न्यू इन्फिनिटी …..
भारताने गणित विषय व तंत्रज्ञान साठी नेहमीच योगदान दिले आहे. भारतात अनेक विद्वान होऊन गेले ज्यांच्या कार्याला जगभर ख्याती भेटली.असेच एक महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांची आज जयंती.
श्रीनिवास अयंगर रामानुजन यांचा जन्म २२ डिसेंबर १८८७ इरोड (तेव्हा मद्रास) तामिळनाडू येथे झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव श्रीनिवास अयंगर व आईचे नाव कोमलताम्मल होते. रामानुजन यांचे वडील एक दुकानात हिशोबनीस तर आई गृहिणी होती. रामानुजन चे प्राथमिक शिक्षण कुंभकोणम गावात झाले. यांनतर तात्यांनी तामिळ माध्यम शाळेत प्रवेश घेतला. ते सुरवाती पासून अभ्यासात हुशार होते. दहावीच्या परीक्षेत ते जिल्ह्यांमधून प्रथम आल्या मुले त्यांना शिष्यवृत्ती देखील भेटली. ह्याच काळात त्यांचा कल गणित विषयाकडे जास्त वाढला. त्यांना त्रिकोणमिती चे पुस्तक भेट म्हणून भेटले होते. गणिताची आवड असल्यामुळे त्यांनी इतर विषयांकडे दुर्लक्ष केले परिणाम स्वरूप बारावीच्या परीक्षेत ते नापास झाले. त्यामुळे त्यांना भेटणारी शिष्यवृत्ती हि बंद करण्यात आली.


रामानुजन यांची आर्थिक परिस्तिथी बरी नव्हती. त्यामुळे पुढचे शिक्षण व रोजगार सारखे प्रश्न समोर होते. त्यांनी नंतर ट्युशन घेण्यास सुरवात केली. परंतु ते सर्वांना स्वतः सारखं हुशार समजून शिकवत होते. ह्या कारणामुळे नंतर शिकवणी सुद्धा बंद करावी लागली. १९०९ साली रामानुजन यांचे लग्न जानकी सोबत झाले. त्यानंतर ते मद्रास येथे नोकरी करायला गेले. परंतु १२ वि उत्तीर्ण नसल्यामुळे तात्यांना नोकरी भेटत नव्हती. ह्याच काळात त्यांची भेट डिप्टी कलेक्टर श्री वी. रामास्वामी अय्यर यांच्यासोबत झाली. गणित विषयाचे ते विद्वान होते. ते रामानुजन यांच्या बुद्धिमत्तेने प्रभावित झाले व दार महा २५ रु भत्ता मंजूर केला. मद्रासला राहूनच रामानुजन यांनी पहिले शोधपत्र “जर्नल ऑफ इंडियन मैथेमेटिकल सोसाइटी” मध्ये प्रकशित केले. त्यांनी १९१२ मध्ये प्रोफेसर हार्डी यांना पत्र लिहून त्यांनी शोधकार्य व प्रमेय यांची माहिती पाठवली. प्रोफेसर हार्डी यांना रामानुजन यांच्या शोधकार्य मुळे प्रोफेसर हार्डी थक्क झाले. त्यांनी ती प्रमेय आपल्या सहकाऱ्यांना दाखवली व रामानुजन यांना त्यांच्या सोबत शोधकार्य करण्यासाठी बोलवले. रामानुजन परदेशात जायला तयार नव्हते. रामानुजन शेवटी निर्णय घेऊन रामानुजन परदेशात गेले. रामानुजन यांना अश्वेत भारतीय असल्यामुळे वर्णभेदला सामोरे जावे लागले. रामानुजन केम्ब्रिज येथे ट्रिनिटी कॉलेज मध्ये प्रोफेसर हार्डी यांच्या सोबत शोधकार्य करू लागले. प्रोफेसर हार्डी त्यांची प्रमेयची वही पाहून थक्क झाले.त्यांच्या शोधकार्याच्या आधारावर त्यांना बी.ए. ची पदवी देण्यात आली.
ते पूर्णतः शाकाहारी होते. म्हणून त्यांना जेवण स्वतः तयार करावे लागत असे. त्या काळात विश्व युद्ध सुरू झाले. तान्दुळ चा होणार पुरवठा बंद झाला. त्याना जेवण करण्यासाठी भाज्या सुद्धा भेटत नव्हत्या. उपाशी राहणे , खूप जास्त थंडी मुळे त्यांची तब्येत खराब होत चालली होती. त्यांना टी.बी. रोगाची लागण झाली होती. त्यांची प्रतिभा पाहून त्यांना रॉयल सोसायटी चे फेलो निवडण्यात आले. ते सर्वात लहान वयात फेलोशिप घेणारे व्यक्ती होते. ट्रिनिटी कॉलेज मध्ये फेलोशिप घेणार ते पहिले भारतीय होते. त्यांना कैम्ब्रिज फिलोसॉफिक सोसायटी चे फेलोशिप हि भेटली.
त्यांच्या आजारपणामुळे डॉक्टरांनी त्यांना भारतात राहण्याचा सल्ला दिला. ते भारतात परत आले. परंतु प्रकृती काही साथ देत नव्हती.
भारतात आल्याच्या २ वर्षानंतर २६ अप्रिल १९२० ला त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांचे निधन पूर्ण रॉयल सॊसायटी व ट्रिनिटी कॉलेज ला हादरवून टाकणारी होती. त्यांचा निधनाने प्रोफेसर हार्डी खूप दुखी झाले व त्यांच्या जीवनावर हि ह्याचा परिणाम झाला.
रामानुजन ह्यांनी एकूण ३५०० प्रमेय जगाला दिली. त्यापैकी बऱ्याच प्रमेय व संशोधन चालू आहे. १७२९ ह्या अंकाला हार्डी रामानुजन नंबर म्हणून ओळखतात. मौक थिटा फंक्शन, रामानुजन प्राईम , रामानुजन`स सम हे त्यांच्या संशोधन पैकी काही प्रसिद्ध संशोधन. त्यांच्या जयंती निम्मित भारत सरकारने २२ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून घोषित केला आहे. तसेच रामानुजन यांना सन्मान म्हणून पोस्ट स्टॅम्प सुद्धा प्रकशित केले आहे. हॉलिवूड ने हि श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवनावर आधारित चित्रपट प्रकशित केले आहे, त्या चित्रपटाचे नाव आहे ‘द मॅन हू न्यू इन्फिनिटी’ (The Man who knew Infinity ). जगातील ह्या महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांना विनम्र अभिवादन…

शेअर करा.ग्रुप मध्ये पोस्ट करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!