शंभू महादेव विद्या मंदिर विद्यालयातील वर्गमित्रांनी १६ वर्षांनंतर आयोजित केले स्नेहमिलन कार्यक्रम.

कार्यकारी संपादक: विनोद कोल्हे
शंभु महादेव विद्या मंदिर वाटूर विद्यालयातील वर्गमित्रांनी आयोजित केला तब्बल १६ वर्षानंतर अप्रतिम स्नेहमिलन कार्यक्रम पार पडला. दिनांक ०५ जानेवारी २०२५ रविवार रोजी तब्बल १६ वर्षांनी सन २००७-०९ मध्ये आपले विद्यालयीन शिक्षण पुर्ण केलेले सर्वच विद्यार्थी आपापल्या परीने उच्च शिक्षणासाठी एकमेकांपासून दूर गेले ते परत असे एकत्र येतील असे कधी वाटलेच नाही.परंतु काही मोजकीच मंडळी एकमेकांच्या संपर्कात होते त्यातूनच काही ध्येयवेड्या युवकांच्या मनात सर्वांना एकत्र आणण्याचे खुळ बसले आणि मग खरी कसरत सुरू झाली.सर्वांची मनधरणी करण्यात पुर्ण दोन महिन्यांहून अधिक काळ गेला आणि तारीख ठरली ०५ जानेवारी २०२५ रविवार रोजी न भूतो नि भविष्य अर्ध्या शतकाहूनही अधिक मित्र आणि मैत्रिणी एकत्र आल्या गोकुळ कृषी पर्यटन विकास केंद्रात सर्व मित्र परिवार संपुर्ण दिवस एकत्र त्या आपल्या बालपनीच्या आठवणीत घातला.सर्व स्नेहसंमेलनाचे उद्दिष्ट एकच सर्वांनी एकमेकांच्या सुख दुःखात सर्वांना सहकार्य करणे हे उद्दिष्ट ठेवून समारोप झाला.यामध्ये काहींनी सिंहाचा तर काहींनी खारीचा वाटा उचलला .. सर्वांनी आपआपली भूमिका अगदी चोख पार पाडली.