तुमच्या साथीनं पून्हा एकदा आपण विजयी होऊन भगवा फडकवू: आमदार संजय शिरसाट
तूम्ही ज्या चांगल्या रस्त्यावरून जातं आहे आणि तुमची गाडी पण जातं तोच रस्ता याचं संजय शिरसाट यांनी बांधला : संपर्कप्रमूख विकास जैन

छ्त्रपती संभाजीनगर – मोहन चौकेकर
संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार संजय शिरसाट यांनी आपल्या निवडणूक प्रचारार्थ जवाहर कॉलनी या भागातील शांतीनिकेतन कॉलनी, त्रिमूर्ती चौक, शिवशंकर कॉलनी, बालाजी नगर, बुद्धनगर, उल्कानगरी, मयूरबन कॉलनी तसेच बजाजनगर अशा विविध ठिकाणी भेटी देत कॉर्नर सभा घेतल्या.
याठिकाणी राहत असलेल्या अनेक नागरीक महिलांनी, व्यापारी वर्गाने आमच्या भागात ज्यांनी अनेक रस्ते, ड्रेनेज लाईनचची आदी विकास कामे केली आहेत त्यांना आम्ही नक्की विजयी करनार तसेच उमेदवार संजय शिरसाट यांना पाठींबा दर्शवित विजयी करण्याचे आवाहन केले.
ज्या जनतेने मला इतक्या वर्ष त्यांचे नेतृत्व करण्याची संधी दिली आहे त्या जनतेचा असलेले नेहमी पासूनच आशिर्वाद माझ्या पाठीशी आज ही तसाच खंबीर पने आहे हे आज तूम्ही जमलेल्या गर्दी मुळे दिसतेय, मी सर्व सामान्य घरातून आलेल्या कामगाराचा मुलगा आहे त्यामुळे मला त्याची जाणीव आहे,मी सर्व सामान्य लोकांचा आमदार आहे, काही लोक बाहेरच्या मतदासंघातील लोक आणून पश्चिम विधानसभा मतदार संघात त्यांनी विकास केल्याचे सांगत आहे पण या जनतेला माहिती आहे की विकासाच दुसर नाव संजय शिरसाट आहे, उबाटा गटाला मतदान म्हणजे एमआयएम ला मतदान करण्यासारखं आहे, बाळासाहेब ठाकरेंच्या स्वप्नांना खऱ्या अर्थाने जिवंत ठेवणारे तूम्ही लोकं आहात, आनंद दिघे साहेबांच्या मार्गदर्शनाने प्रेरणा घेणारे आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली एकत्र आलेले आपण, तुमच्या सारख्या जनतेच्या विश्वासाने सक्षम झालो. तीन वेळा विजय मिळवूनही आपला उत्साह कमी झालेला नाही. आता पुन्हा एकदा आपल्याला याच बळावर ऐतिहासिक कामगिरी करायची आहे त्यामुळे यावेळी आपला हककचा माणूस पहा आणि नंबर ३ च बटन दाबून शिवसेना पक्षाचा व महायुतीच्या उमेदवाराला मतदान करून निवडूण द्या असे प्रतिपादन पश्चिम मतदारसंघाचे उमेदवार संजय शिरसाट यांनी केले.
उमेदवार संजय शिरसाट हे विकासाच्या मुद्द्यावरच निवडून येणारं आहे, त्यांच्या दारात आलेला माणूस कधीचं खाली हाथ गेला नाही त्यांनी अनेक विकास करणाऱ्या बरोबर त्यांनी समाजउपयोगी कामे देखील केली आहे, त्यांनी कधी जात पात न पाहता अनेक ठिकाणी सभागृह, रस्ते निधी आणून केले आहेत, आता प्रत्येक वॉर्ड मध्ये काही लोक जात आहे आणि सांगत आहे की, संजय शिरसाट यांनी कोणती विकास कामे केली आहेत त्यांना मला एक सांगायचं की तूम्ही ज्या चांगल्या रस्त्यावरून जातं आहे आणि तुमची गाडी पण जातं तोच रस्ता याच आमदार संजय शिरसाट यांनी बांधला म्हणजेच विकास केला आहे त्यामुळं आपल्याल चिंता नाही विजयी तर संजय शिरसाट होणारच आहे आपण देखील भरघोस मतांनी संजय शिरसाट यांना निवडून देण्याचे आवाहन जनतेला संपर्कप्रमुख विकास जैन यांनी केली आहे.
याप्रसंगी संपर्कप्रमूख विकास जैन, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ, उपशहरप्रमूख राजेश जंगले, गणेश जाधव, अनिल मुळे, भाजपा नंदु गवळी, शंतनु उरेकर, जालिंदर शेंडगे, संघर्ष सोनवणे, दत्ता शेलार, योगेश वर्मा, देविदास राठोड, हेमंत खेडकर, संजय जोशी, हरीश कुलकर्णी, सतिश कोठेकर, अनिल विधाते, सुनील सोनवणे, संदिप आरके, मुकुंद विभुते, सागर निलकठ, सुरेंद्र कुलकर्णी, जगदीश पाटिल, राज जावळे, अजय दहीफळे, स्वप्नील साबळे, साईनाथ वाहुळ, अमर जाधव, अतुल नाईकवाडे, मंगेश तोडकर, निखिल कुलकर्णी आदी शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादीचे सर्व पदाधिकारी, महीला युवासेना असंख्य लोकांची उपस्थिती होती.