जिल्हास्तरीय अबॅकस स्पर्धेत जिनियस अबॅकसचे नेत्रदीपक यश!

संपादक – गौरव बुट्टे
जिनियस अबॅकस जालना. दि .१७/११/२४ संभाजीनगर येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत संभाजीनगर, परभणी ,जालना येथील परतुर ,अबंड, बदनापूर, भोकरदन, बुलढाणा अशा सर्व तालुक्यातून स्पर्धकांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेत जिनियस अबॅकस जालना च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
जवळपास ६००ते६५० मुलांच्या या स्पर्धेचे स्वरूप ६ मिनिटात १०० गणिते सोडविणे असे होते जिनियस अबॅकस च्या विद्यार्थ्यांनी ४.५, ५ ,५.५ मिनिटात गणिते सोडवून नंबर मिळवले.
यात अनय रुपदे, विराज जाधव, आराध्या गंडाळ, प्रेम चितोडे,या मुलांनी प्रथम क्रमांक पटकावला.
श्रेया कान्होटे, भार्गव दाभाडकर, आयुष कुलकर्णी , उत्कर्ष देशमुख,ऋषिका देशमुख, भावेश भुतेकर, तेजस्वी रेगुडे , अनन्या खानापुरे,प्रणव येडके, श्रद्धा गोगडे या मुलांनी त्यांच्या गटातून द्वितीय क्रमांक मिळविला.
तर नेत्रा सातोनकर, कुनाल पोवरा, कार्तिकी लिखे, पूर्वा कुलकर्णी, सार्थक लोखंडे, विराज राऊत, वरद अस्कांद, केतकी भाले या मुलांनी त्यांच्या गटात तृतीय क्रमांक पटकावला. सर्व विद्यार्थ्यांनी कोल्हापूर येथील राज्यस्तरीय स्पर्धेत आपले स्थान निश्चित केले.
याशिवाय शौर्य खांडेकर, पृथा खानापूर, श्रेयस गवारे, आराध्या कुलकर्णी, सार्थक कांहोटे, दैविक सोरटी, साक्षी दसपुते, ऋषीकेश खंदारे ,नीरज चंदनपथ या विद्यार्थ्यानी त्यांच्या गटातून उत्तेजनार्थ बक्षिसे मिळविली.
या सर्व विद्यार्थ्यांना जीनियस अबॅकस च्या संचालिका शितल जोशी, मंजुषा भाले यांचे मार्गदर्शन लाभले. जिनीयस अबॅकस या संस्थेला सुरू होऊन अवघे ३ वर्ष झाले. तरीपण या ३ वर्षात संस्थेचा विस्तार भरपूर वाढला आहे.२ विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या .या संस्थेत सध्या 150 विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत .या वर्षी संस्थेला बेस्ट सेंटर अवॉर्ड ने सन्मानित करण्यात आले.