जीवनराव पारे विद्यालयात ” महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने स्वीप कार्यक्रमाअंतर्गत रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली.
चंदनझिरा : जीवनराव पारे विद्यालयात ” महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०२४ च्या अनुषंगाने स्वीप कार्यक्रमाअंतर्गत रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी टक्केवारी अधिकाधिक वाढावी म्हणून नागरिकांमध्ये मतदार जागृती पर उपक्रम स्वीप कार्यक्रमाअंतर्गत जीवनराव पारे विद्यालयात रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली.
रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन चंदनझिरा विभागाचे निवडणूक पर्यवेक्षक श्री बाळासाहेब आबुज सर यांच्या हस्ते करण्यात आले.पर्यवेक्षक श्री बाबासाहेब आबुज यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले कि विधानसभा निवडणुक नागरिकांमध्ये जागृती होणे आवश्यक आहे.२० नोव्हेंबर रोजी मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या परिवारातील व परिसरातील मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले पाहिजे.
रांगोळी स्पर्धेत अंजली गणेश आदमाने,कावेरी विश्वंभर निरेवाड,गायत्री विजय धांगड,मयुरी कपिल आदमाने,किरण माणिक आदमाने, निकिता बालासाहेब ताठे,कोमल बंडू सोनवणे, दुर्गा कैलास धोत्रे,जयश्री गजानन पोपळघट या विद्यार्थ्यांनीनी सहभाग घेतला.
रांगोळी स्पर्धेचे परीक्षण श्री माधव भद्रे व श्री सुभाष पारे यांनी केले.