अबॅकस स्पर्धेत नैतिक गडवे या विद्यार्थ्याचे यश जालना

जालना – प्रतिनिधी
पुणे येथे नुकत्याच झालेल्या चौदाव्या नॅशनल आणि सातव्या इंटरनॅशनल स्पर्धेत जालन्याच्या नैतिक गडवे या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.यानिमित्ताने त्याचा स्मार्ट किड्स अबॅकस लर्निंग प्रायव्हेट लिमिटेड च्या कळमकर सरांनी ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन सत्कार केला.तसेच स्मार्ट किड्स अबॅकस अकॅडमी च्या जयश्री बुट्टे मॅडम यांना देखील बेस्ट फ्रॅंचाईजी अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेमध्ये आर्यन शेळके, अंजनी खंदारकर, शरयू खंदारकर, सिद्रा मोमीन आराध्या खोत, अंश राऊत, शिवामृत ढाकरे,नैतिक गडवे मनस्वी दांडगे, विराज दांडगे, जानवी जायेभाये,भाग्यश्री नाकिरे, सानिध्य कांबळे, यांनी देखील पुणे येथे अबॅकस स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यांना अबॅकस अकॅडमीच्या संचालिका जयश्री बुट्टे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.तसेच ज्या विद्यार्थीनी अबॅकस चा नऊ लेवल पूर्ण केल्या आहेत त्यांचा ही ट्रॉफी आणि सर्टिफिकेट देऊन सन्मान करण्यात आला.