दिवसभराच्या महत्त्वाच्या अपडेट / हेडलाईन्स/ बातम्या

मोहन चौकेकर
एक्झिट पोलचे निकाल समोर येताच महायुती व महाविकास आघाडीकडून हालचाली सुरु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, जयंत पाटील , संजय राऊत, बाळासाहेब थोरातांकडून अपक्ष आणि बंडखोर उमेदवारांशी संपर्क करण्यास सुरु ; राज्यात सरासरी 65 टक्क्यांपेक्षा अधिक मतदान, श्रीमंतांच्या मुंबईत गरिबी टक्का, जिल्ह्यात सरासरी 42.59 टक्के मतदान
महाराष्ट्रात महायुतीचचं सरकार येणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विश्वास; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मतदानाची टक्केवारी वाढते, तेव्हा भाजप आणि मित्रपक्षाला फायदा होतो ; एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री होतील, गुवाहाटी पार्ट-2 करण्याची गरज नाही, आम्ही नवीन ठिकाणी जाऊ, शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांचें मोठे वक्तव्य ; एकनाथ शिंदेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, मी 25000 मतांच्या फरकानं विजयी होणार, संतोष बागरांना विश्वास
एक्झिट पोल हा फ्रॉड आहे,महाविकास आघाडीला 160 -165 जागा मिळू शकतात, संजय राऊतांना विश्वास, म्हणाले, 26 ला सरकार स्थापन करणार
सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांनी आधीच पाठीशी राहणार असल्याचे सांगितलं होतं, अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांचा गौप्यस्फोट ; शरद कोळींनी प्रणिती शिंदे, सुशीलकुमार शिंदे हे भाजपची बी टीम असल्याचा केला आरोप ; शिंदेनी भाजपसोबत हातमिळवणी केली शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापला; ठाकरे गटाच्या शरद कोळींची सडकून टीका ; शरद कोळींच्या विरोधात महिला काँग्रेस कार्यकर्त्या आक्रमक, बांगड्या आणि चपला दाखवत केला निषेध, महिलांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
नागपूरमध्ये EVM मशीन घेऊन जाणाऱ्या कारवर हल्ला; निवडणूक प्रक्रियेचं उल्लंघन केल्याचा जमावाचा आरोप ;
धनंजय मुंडेंच्या आरोपावर राजेसाहेब देशमुखांचं स्पष्टीकरण; 122 मतदान केंद्रावर फेर मतदानाची मागणी
बारामती कोर्टाकडून अजित पवारांना दादांना समन्स, 2014 च्या निवडणुकांमध्ये केलेल्या एका वक्तव्यामुळे बारामतीच्या कोर्टाकडून समन्स ; बारामतीत अजितदादा 40 हजार मतांनी पडणार, महादेव जानकरांचा दावा, प्रफुल पटेल म्हणाले, हा दादा नव्हे, दुसरा दादा पडणार!
लाचखोरीच्या आरोपांचा अदानी उद्योग समूहाला मोठा फटका, ग्रुपच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स कोसळले; चार स्टॉक्सना थेट लोअर सर्किट! ; अदानी जागतिक / जगातील श्रीमंत यादी मधुन बाहेर ; अदानी उद्योग समूहाने लाचखोरी, फसवणुकीचे सर्व आरोप फेटाळले, परिपत्रक काढून दिलं स्पष्टीकरण!
दहावी अन् 12 वी बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर, यंदा 8 दिवस आधीच परीक्षा ;
मालवण छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेतील आरोपीला मुंबईतून जामीन, चेतन पाटीलची सुटका
शाळेचं गेट अंगावर पडून सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा कोल्हापुरातील जागीच मृत्यू; लघूशंकेसाठी जात असताना घडली घटना