विद्यार्थी विज्ञान मंथन परिक्षेत खुशी मदन ओफळकर जिल्ह्यात प्रथम

भोकरदन प्रतिनिधी :- सचिन वेंडॊले
विद्यार्थी विज्ञान मंथन हया परिक्षा मधे खुशी मदन ओफळकर ह्या विद्यार्थिनीने परिक्षेत जिल्ह्यातून प्रथम येत राज्य स्तरिय परिक्षा साठी पात्र झाली आहे.विद्यार्थी विज्ञान मंथन( VVM) ही परीक्षा संपूर्ण भारतात एकाच वेळी घेण्यात येते. विज्ञान विषयक आधारित ही परीक्षा असते महाराष्ट्र मध्ये या परीक्षेसाठी पाच विभाग पाडलेले आहे यात देवगिरी एक या विभागात 14 जिल्ह्याचा समावेश असून प्रत्येक विभागातून प्रत्येक वर्गासाठी वर्ग 6 वी ते 11वी करिता वीस मुलांची राज्यस्तरीय परीक्षासाठी निवड केल्या जाते. धावडा येथील ग्रामपंचायत अधिकारी मदन बाळाभाऊ ओफळकर यांची मुलगी कु. खुशी ओफळकर हिने या परीक्षेत बुलढाणा जिल्ह्यातून एकटीच उत्तीर्ण होऊन राज्यस्तरीय परीक्षेसाठी पात्र झाली आहे. अशी परीक्षा उत्तीर्ण होणारी ही परिसरातील एकमेव विद्यार्थ्यांनी आहे या अगोदर सुद्धा खुशीने नवोदय, ऑल इंडिया सैनिक स्कूल, डॉ होमी बाबा बाल वैज्ञानिक, डॉ सी व्ही रमण बाल वैज्ञानिक परिक्षा,स्कॉलरशिप परिक्षा , ऑलिम्पियाड परिक्षा अशा विविध परीक्षा क्वालिफाय केलेल्या आहेत यामुळे धावडा परिसरात खुशीची खूप चर्चा आहे व तसेच धावडा येथील सरपंच गंगुबाई तुकाराम बोराडे व उपसरपंच इकबाल खान अक्रम खान पठाण यांनी खुशीचे स्वागत करून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहे.
Xyz