परभणी प्रकरणी आंबेडकरी समाजाच्या वतीने चंदनझीरा बंदची हाक देऊन महामार्गावर रस्ता रोको आंदोलन.

कार्यकारी संपादक : विनोद कोल्हे
परभणी येथील संविधान प्रतिकृतीच्या नासधूस प्रकरणी परभणी येथे आंबेडकरी चळवळीच्या वतीने करण्यात आलेल्या निषेध मोर्चामध्ये तसेच परभणी बंद च्या वेळी पोलिसांच्या वतीने कोंबिंग ऑपरेशन द्वारे आंबेडकरी समाजावर अमानुष लाठीचार्ज केला. यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाचा न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाला. त्या पार्श्वभूमीवर आज दिनांक 16 सोमवार रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास जालना शहरातील चंदनझीरा येथे आंबेडकरी समाजाच्या वतीने चंदनझीरा बंदची हाक देण्यात आली व जालना संभाजीनगर औरंगाबाद महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.यावेळी परिसरातील व्यवसायिकांनी आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून या बंदला सहकार्य केले. परभणी पोलिसांच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करून दोषी अधिकाऱ्यां वर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.महामार्गावर रस्तारोको आंदोलन करून परभणी पोलीसांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आल्या.जालन्याच्या प्रशिक्षणार्थी DYSP तथा चंदनझीरा पोलीस ठाण्याच्या प्रभारी करिष्मा चौधरी यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.यावेळी आंबेडकरी समाजातील नगरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.चंदनझीरा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने रस्तारोको व बंद दरम्यान चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.