दिवसभराच्या महत्त्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या

मोहन चौकेकर
अनिल देशमुखांना अहवालात क्लीन चिट नाही, न्यायमूर्ती. चांदीवाल यांचा गौप्यस्फोट ; अहवालात क्लीन चिट शब्द नसेल, पण माझ्याविरुद्ध कुठलेही पुरावे नाहीत असा उल्लेख, अनिल देशमुखांचा दावा
सचिन वाझेंकडून शरद पवार-अजित पवारांना तर अनिल देशमुखांकडून देवेंद्र फडणवीसांना गोवण्याचा प्रयत्न, पण मी ते रेकॉर्डवर घेतले नाही, न्या. चांदीवाल यांचा दावा ; सचिन वाझे अत्यंत हुशार माणूस होता, त्याच्याकडे भरपूर मटेरिअल होतं, पण पुराव्याअभावी रेकॉर्डवर घेण्यात अडचण, परमबीर सिंगही पुरावे देऊ शकले नाहीत, न्या. चांदीवाल यांचे स्पष्टीकरण
उद्धव ठाकरे आणि मी एकत्र येऊ नये यासाठी अनेकजण प्रयत्नशील, राज ठाकरेंचं वक्तव्य ; मी भाजपसोबत कंम्फर्टेबल, राज ठाकरेंनी सांगितली ‘मन की बात’, विधानसभेला स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार हे अगोदरच सांगितल्याचं स्पष्ट केले
इंग्लिश न येताही मी राज्याचं बजेट सादर करतो, युगेंद्रनं साधा टिंब काढून दाखवावं, बारामतीतूनच अजितदादा पवारांचा सणसणीत टोला ; बाकीच्यांचं वय बघता, बारामतीचं सगळं मलाच बघायचंय, ही निवडणूक माझ्या भवितव्यासाठी महत्त्वाची, अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन
शरद पवारांचे फोटो आणि व्हिडीओ कुठंही वापरु नका, तुमच्या उमेदवारांना सूचना द्या, सुप्रीम कोर्टाचे अजित पवारांच्या राष्ट्रवादीला आदेश, इलेक्ट्रॉनिक नोटिफिकेशनही देण्याची सूचना
पालघरमध्ये दिलजमाई, विधानसभेचं तिकीट नाकारल्यानंतर ओक्साबोक्सी रडणारे श्रीनिवास वनगा मुख्यमंत्री शिंदेंसोबत स्टेजवर, इकडे तिकडे पाहण्याची गरज नाही, तुझं चांगलं होईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा श्रीनिवास वनगांना शब्द ; पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे घाबरत नाही, मला हलक्यामध्ये घेतलं म्हणून टांगा पलटी झाला, पालघरमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला
जोगेश्वरी पूर्व मतदारसंघात ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले, मुलींना मद्यधुंद गुंडांनी मारहाण केल्याचा खासदार रवींद्र वायकरांचा आरोप ; महिलांच्या पदराआड लपून लढण्यापेक्षा समोर या, जोगेश्वरीतील राड्यानंतर ठाकरे गटाचे उमेदवार बाळा नर यांचे रवींद्र वायकरांना आव्हान
पालघरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगेची तपासणी, बॅगेत फक्त कपडे आहेत, युरीन पॉट नाही, नाव न घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला ; बारामतीत अजित पवारांच्या हेलिकॉप्टरसह बॅगांची तपासणी, बॅगेत चकली, चिवडा, लाडू आणि गुलाबी कोट सापडले
टर्म संपायच्या आत आधी बांगलादेशी-रोहिंग्यांना वेचून बाहेर काढू, केंद्रीय मंत्री अमित शाहांचं घाटकोपरमधील सभेत वक्तव्य ; महाराष्ट्रात महायुतीचं सरकार येणार, महाविकास आघाडीचा सुपडा साफ होणार, जिंतूरच्या सभेत अमित शाहांचा विश्वास
संजय राऊतांच्या अंगात येऊन महाविकास आघाडीचं सरकार आलं, पण अडचण एवढी झाली की अंगातलं उतरलंच नसल्याने सरकार गेलं, कडेगावच्या सभेत विश्वजित कदमांची टीका