क्राईम
नागेवाडी येथे 17 वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या.

- कार्यकारी संपादक : विनोद पाटील कोल्हे
- नागेवाडी येथील एम. एस. एस. कॉलेज येथील विध्यार्थी शिवराज वानखेडे रा. हसनाबाद वय : 17 वर्ष या विध्यार्थीनी आज गळफास घेऊन आत्महत्या केली. आज त्याचे सर्व रूम मेट यांनी त्याला कॉलेज ला जाण्यासाठी आग्रह केला परंतु तो आज कॉलेज ला गेला नाही. त्याचे मित्र कॉलेज वरून परतल्या नंतर बघितले असता रूम चा दरवाजा वोढलेला होता. त्यानी रूम मध्ये जाऊन बघितले असता त्यांचा मित्र शिवराज हा रूम मध्ये गळफास घेतलेला दिसल्या नंतर त्यानी तात्काळ नागेवाडी येथील समाज सेवक अनिल तिरुखे यांना कॉल केला अनिल तिरुखे यांनी चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजपूत यांना या प्रकारनाची माहिती दिली. तात्काळ चंदनझिरा पोलिस कर्मचारी घटना स्थळी दाखल झाले. पुढील तपास पोलीस करत आहेत.