विठ्ठल प्राथमिक शाळेत मतदार जगजागृती रॅली निमित्त कार्यक्रम संपन्न.

कार्यकारी संपादक : विनोद कोल्हे
विठ्ठल प्राथमिक व माध्यमिक शाळेत मतदार जनजागृती रॅली निमित्त रांगोळी स्पर्धा संपन्न झाली.याप्रसंगी कार्यक्रमाला अध्यक्षा म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका शुभांगी येमुल या उपस्थित होत्या. मतदार जनजागृती रॅलीचे औचित्य साधून शाळेमध्ये रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या रांगोळीच्या स्पर्धेच्या माध्यमातून मतदार जनजागृतीचे विविध संदेश विद्यार्थ्यांनी यावेळी दिले .यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन उत्कृष्ट पद्धतीने रांगोळी काढल्या. यामध्ये प्रथम क्रमांक ऋतुजा प्रभाकर भुसारे 7वी, द्वितीय क्रमांक संजीवनी दत्ता वखरे 6वी व तृतीय क्रमांक कार्तिकी राजू भुतेकर 8वी या विद्यार्थिनींनी पटकावला. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका शुभांगी येमूल यांनी विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्त्व या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.
तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी,व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते..