महाराष्ट्र

दिवसभराच्या महत्त्वाच्या अपडेट / हेडलाईन्स/ बातम्या 

मोहन चौकेकर

लाडकी बहीण योजना रक्षाबंधनाला सुरु झाली, रक्षाबंधनाच्या दिवशीपासूनच रक्कम वाढवायची, सुधीर मुनगंटीवार यांचे वक्तव्य, नवीन सरकार स्थापन झाल्यानंतरच बहि‍णींना 1500 मिळणार की 2100 रुपये मिळणार हे कळेल ; नवीन मुख्यमंत्री तशी घोषणा करतील

महायुतीत मंत्री होण्यासाठी भाजपासह महायुतीच्या सर्व आमदारांना जावे लागणार गृहमंत्री अमित शाहांच्या कसोटीतून, अमित शाहांनी मागवलं संभावित मंत्री होऊ इच्छिणाऱ्या आमदारांचे रिपोर्ट कार्ड

एकनाथ शिंदेंनी पत्रकारपरिषदेतून गृहखात्याच्या मागणीवर ठाम असल्याचा स्पष्ट मेसेज दिला, बॉडी लँग्वेजही बदलली ; एकनाथ शिंदेंनी आजच्या साऱ्या बैठका रद्द केल्या, डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिल्यानं ठाण्यातच करणार मुक्काम

मी उपमुख्यमंत्री होण्याच्या सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या, श्रीकांत शिंदे यांचं स्पष्टीकरण, पक्षाचं काम करण्यासाठी केंद्रीय मंत्रिपद नाकारल्याची माहिती ; ज्या मागण्या शिंदेसेना करतायेत त्यावर भाजपने ठरवलं तर एका मिनिटात त्यांना चिरडून टाकतील, संजय राऊतांची बोचरी टीका

बाळासाहेब थोरातांना पोस्टल मते 70 टक्के, मग EVM मध्ये मागे कसे, ठाकरे गटाने प्रेझेंटेशन मांडले

संघाचे एजंट असलेल्या नाना पटोलेंनी नागपुरातील काँग्रेस जाणूनबुजून खिळखिळी केल्याचा बंटी शेळकेंचा आरोप, दिल्लीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या हालचालींना वेग ; विधानसभा निवडणुकीत पक्ष विरोधी काम करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंचा इशारा

आमच्या व्हाटसअप ग्रुप ला जॉइन व्हा

गरज सरो वैद्य मरो, हीच भाजपची भूमिका; सत्तेसाठी देवेंद्र फडणवीसांचा फोन मात्र मतदारसंघातील कामं आणि निधीसाठी एकदाही फोन केला नाही, बच्चू कडूंचा आरोप

ईव्हीएमवर आक्षेप घेत बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचं ठरवणाऱ्या सोलापुरातील मारकडवाडीमध्ये जमावबंदीचे आदेश लागू, मतदान घेतल्यास कारवाई करण्याचा प्रशासनाचा आदेश

राज्यात पुढील 3 दिवस पावसाची शक्यता, तळ कोकण, मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट, हवामान खात्याचा अंदाज

2024 मध्ये करिअरचा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर, आता 37व्या वर्षी अभिनयातून संन्यास घेण्याची घोषणा, अभिनेता विक्रांत मेस्सीची शॉकिंग पोस्ट

ह्यांना कळत कसं नाही, मरणार आहात एक दिवस, जाणार आहात तुम्ही ; राजकीय नेत्यांवर नाना पाटेकरांनी व्यक्त केली तीव्र नाराजी 

शेअर करा.ग्रुप मध्ये पोस्ट करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!