महाराष्ट्र

दिवसभराच्या महत्त्वाच्या अपडेट / हेडलाईन्स / बातम्या 

मोहन चौकेकर

 विधानसभेच्या 236 जागांवर यश मिळवल्यानंतर महायुतीकडून नेता निवडीची प्रक्रिया सुरु, शिवसेनेकडून एकनाथ शिंदे तर राष्ट्रवादींकडून अजित पवारांची नेतेपदी निवड, भाजपकडून देवेंद्र फडणवीसच नेतेपदी जवळपास निश्चित, सत्ता स्थापनेत मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला कायम ; राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीसांना पाठिंबा देण्याच्या तयारीत 

 आमच्या अपेक्षेप्रमाणे निकाल नाही, पण जनतेचा कौल आहे, निकालाविरोधात कोर्टात जाणार नाही, ईव्हीएमबाबत माहिती घेऊन बोलेन, निकालाच्या 24 तासानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया 

 शरद पवार, संजय राऊत, प्रियंका चतुर्वेदींची पुढची राज्यसभेची खासदारकी टर्म धोक्यात; महाविकास आघाडीला धक्का ; काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मतं, जागा फक्त 16, अजितदादांचा स्ट्राईकरेट शरद पवारांपेक्षा भारी ; निकाल आधीच ठरलेला होता फक्त मतदान करून घेतलं, या सर्वाला सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड जबाबदार, संजय राऊतांचा आरोप 

विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद देणं आता सत्ताधाऱ्यांच्या हातात? ; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे काही आमदार संपर्कात, 4 महिन्यात रिझल्ट दिसेल, आश्चर्य वाटू देऊ नका, अनिल पाटील यांचा मोठा दावा 

 निकालानंतर विधानपरिषदेच्या 6 जागा रिक्त, नाराजांना खूश करण्याची महायुतीला पुन्हा संधी; नेमकी कुणाला संधी मिळणार? 

महायुतीच्या माऱ्यापुढे अखेर शरद पवारांचा गड ढासळला, पश्चिम महाराष्ट्रात महायुतीला 58 पैकी 46 जागा ; सोलापूर जिल्ह्याने शरद पवारांची इभ्रत वाचवली, चार मतदारसंघांत तुतारी निनादली ; पुणे जिल्ह्यात 21 पैकी 18 जागांवर महायुतीचं वर्चस्व 

आमच्या व्हाटसअप ग्रुप ला जॉइन व्हा

 विधानसभा निवडणुकीत मनसेचचा दारुण पराभव , अमित ठाकरेंना सुद्धा पराभवाचा दणका, शिवतीर्थवर राज ठाकरेंनी बोलावली बैठक ; मनसेमुळे उद्धव ठाकरेंचे 10 आमदार तरले, आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई, सुनील प्रभू यांच्या जागा झाल्या सेफ ; राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची हीच ती वेळ आहे का, प्रकाश महाजन म्हणाले, त्यांनी साद घालावी! 

 मराठा आरक्षणाचं तातडीनं नाव घेतलं नाही तर मराठे पुन्हा छाताडावर बसणार; मनोज जरांगे पाटील यांचा पुन्हा उपोषणाचा इशारा ; पुन्हा आला की, मी पुन्हा बसणार! मनोज जरांगे पाटलांचा देवेंद्र फडणवीसांना थेट इशारा

 27 कोटी विषय क्लोज! अवघ्या 10 मिनटात ऋषभ पंतने मोडला अय्यरचा विक्रम, आयपीएलच्या लिलावात इतिहासामधील ठरला सर्वात महागडा खेळाडू ; प्रिती झिंटाच्या गळाला लागला चॅम्पियन कर्णधार श्रेयस अय्यर, पंजाबने श्रेयसला 26.75 कोटी रुपयांना खरेदी केले

यशस्वी जैस्वाल आणि विराट कोहलीच्या शतकानंतर बुमराह-सिराजचा धुमाकूळ,ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिली कसोटी जिंकण्यासाठी 7 विकेटची गरज! 534 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची 3 बाद 12 अशी स्थिती ; 491 दिवसांनी संपली प्रतीक्षा! ‘किंग कोहली’चा धमाका, पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध ठोकले शतक 

शेअर करा.ग्रुप मध्ये पोस्ट करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!