महाराष्ट्र

हे शब्द आज माझे झाले मुके तरीही ते बोलतील भाषा हमखास वादळाची ! — अमृतमहोत्सवी संविधान दिन निमित्ताने डॉ. विजयकुमार कस्तुरे यांचे वक्तव्य

मोहन चौकेकर

जळगाव : दोन वर्षे अकरा महिने अठरा दिवसांच्या प्रदिर्घ संशोधनात्मक अध्ययनशील परिश्रमानंतर भारता सारख्या खंडप्राय व सर्व धर्म संस्कृतीचे वास्तव्य असलेल्या देशासाठी शिल्पाकारलेले ‘ भारतीय संविधान ‘ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या घटना सभेला ते सुपूर्द करण्याला व घटना समितीने ते स्विकारण्याच्या त्या दि. २६ नोव्हेंबर, १९४९ च्या पावन क्षणाच्या अमृतमहोत्सवी समारंभाच्या निमित्ताने जळगाव जिल्हा येथील, सामाजिक न्याय भवनमध्ये, बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स ( बाजार ), म. फुले रा. शाहू डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्य मंच, जळगाव आणि सामाजिक न्याय विभाग, जळगाव जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य राज्यस्तरीय कवी संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना आपल्या वक्तव्यामधून, कित्येक दशकांच्या सामाजिक समर्पित सेवेस्तव विविध राष्ट्रीय तथा अंतर्राष्ट्रीय पुरस्कारासह साऊथ वेस्टर्न अमेरिकन विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट पदवी प्राप्त डॉ. विजयकुमार कस्तुरे, ॲडव्होकेट, चिखली, बुलढाणा, राष्ट्रीय कार्यकारी उपाध्यक्ष, केंद्रीय मानवाधिकार संगठन नई दिल्ली यांनी वरील प्रमाणे निवेदन करून उपरोक्त सर्व महामानवांना व भारतीय संविधानास आपल्या काव्यगायनातून मानवंदना दिली.
या अभिनव सोहळ्याला. भगवान भटकर, कार्यक्रम अधिकारी, जळगाव आकाशवाणी, तथा  भरत शिरसाठ, महासचिव, बौद्ध साहित्य परिषद, महाराष्ट्र यांची तथा बानाईचे अध्यक्ष मा. आर. जे. सुरवाडे यांच्या सह ज्येष्ठ साहित्यिक तथा समर्पक कथाकारीसाठी अमेरिकन मानद डॉक्टर ऑफ लिटरेचर पदवी प्राप्त डॉ. बबनराव महामुने,संभाजीनगर ( औरंगाबाद ), ज्येष्ठ समाजसेवक म्हणून अमेरिकन डॉक्टरेट पदवी प्राप्त कवी डॉ. डी. व्ही. खरात, सचिव, नागसेन क्रिडा व सांस्कृतिक समिती, चिखली, बुलढाणा, शाहीर इश्वर वाघ, ज्येष्ठ पत्रकार सोपान भवर इ. मान्यवर व ज्येष्ठ कवी साहित्यिक निमंत्रित होते.
याप्रसंगी भारतीय संविधान दिना संदर्भाचे औचित्य साधून मान्यवरांनी आपले विचार मांडले. तसेच ज्येष्ठ कवयित्री ज्योती वाघ तथा शहानूर कवी सुशांत मेढे, मनोहर तायडे, जळगाव, मा. सोनडवले, नागपूर इत्यादी उपस्थित सर्व मान्यवर कवींनी भारतीय संविधानावरील आपापल्या सुरेख गझल-रचना सादर करून संविधान सोहळ्यात चैतन्य निर्माण केले.

शेअर करा.ग्रुप मध्ये पोस्ट करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!