मतमोजणीनिमित्त जालना ते छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील वाहतुकीच्या मार्गात बदल.

कार्यकारी संपादक : विनोद कोल्हे
जालना,दि.22 जिल्ह्यात जालना विधानसभा मतदारसंघ- 101 मतदारसंघाची मतमोजणी शनिवार दि. 23 नोव्हेंबर 2024 रोजी जालना येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पार पडणार आहे. तसेच बदनापुर विधानसभा (अ.जा.) मतदारसंघाची बदनापुर येथील कृषी महाविद्यालय मतमोजणी सकाळी 7 वाजेपासुन फेरनिहाय मतमोजणी संपेपर्यंत चालणार आहे. रस्ता मोकळा रहावा व रस्त्यावर वाहने उभी राहुन मार्गात अडथळा निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, या दृष्टीने वाहतुकीच्या नियमनासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये या मार्गावरील वाहतुक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. असे आदेश पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी जारी केले आहेत.
छत्रपती संभाजीनगरकडुन येणारी व ग्रेडर टी पॉइंट पासुन ते छत्रपती संभाजीनगर जाणारी वाहतुक ही हॉटेल इंद्रायणी चौक चंदनझिरा पासुन ते ग्रेडर टि पॉईट पर्यंत छत्रपती संभाजीनगर ते जालना हायवे रोडवरुन एक मार्गी म्हणजे जालना ते छत्रपती संभाजीनगर जाणाऱ्या रस्त्याने येईल व जाईल.
जालना ते छत्रपती संभाजीनगर, जालना एमआयडीसीकडे जाणारी वाहतुक ही ग्रेडर टी पाँईटपासून ते हॉटेल इंद्रायणी चौक चंदनझिरापर्यंत जालना ते छत्रपती संभाजीनगर हायवे रोडने एकमार्गी जाईल व येईल.
जालना ते छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी व छत्रपती संभाजीनगरकडुन जालनाकडे येणारी वाहतुक बदनापुर ते सोमठाणा फाटा व सोमठाणा फाटा ते बदनापुर अशी एक मार्गी म्हणजे जालना ते छत्रपती संभाजीनगर जाणाऱ्या रस्त्याने येईल व जाईल. हा आदेश दि.23 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 5 वाजेपासुन मतमोजणी संपेपर्यंत अंमलात राहील. असेही आदेशात नमुद केले आहे.