ए टू झेड स्कूल मध्ये स्पोर्ट्स दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले.
ए टू झेड स्कूलचे कार्य ए टू झेड विटामिन सारखेच - प्राध्यापक श्रीकांत चिंचखेडकर

ए टू झेड स्कूल मध्ये स्पोर्ट्स दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले.
या कार्यक्रमानिमित्त प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक श्रीकांत चिंचखेडकर यांनी स्पोर्ट्स दिनानिमित्त विद्यार्थी वर्ग व बालमित्रांशी साधला संवाद
विद्यार्थ्यांना व बालवर्गांना खेळासंबंधी व खेळातून शिक्षणाचे व अभ्यासाचे महत्त्व अगदी सोप्या भाषेत सांगितले. आपल्या शैक्षणिक प्रगती बरोबरच तन आणि मन आपल्याला सुदृढ ठेवायचे असल्यास ते खेळातून अर्थातच स्पोर्ट द्वारे कसे ठेवले जाऊ शकते याचे बालमित्रांना अगदी सोप्या सहज शब्दांमध्ये सांगितले. या प्रसंगी त्यांनी स्वामी विवेकानंदाचे खेळाबद्दल चे विचार काय तसेच बजरंगबली हनुमान, लोकमान्य टिळक यांचे दाखले देत बाल विद्यार्थी वर्गाला मोलाचे मार्गदर्शन केले. श्रीकांत सरांनी खेळाचे महत्व विशद करताना विविध गोष्टी सांगून त्यांच्यात सांघिक भावना निर्माण होऊ शकते तर मुले ही देवाघरची फुले आहेत मनाची शुद्धता शुचिता त्यांच्यातील दैवी संपदा आहेत .त्यामुळे ते जास्त सुदृढ व निकोप बनू शकतात. खेळाने खेळाडू वृत्ती व सांघिक वृत्ती वाढते, कोणत्याही प्रसंगात अचूक निर्णय घेण्याची क्षमता वाढते. खेळ मैदानी असो वा बौद्धिक मानवी मन सतेज, सुदृढ व निरोगी बनवण्याचे सामर्थ्य खेळामध्ये आहे. मुलांचे आराध्य व आवडते असणारे गणपती बाप्पा व बाल हनुमान लहानपणी भरपूर खेळायचे सर्वांना आनंद द्यायचे व स्वतःही आनंद लुटायचे अगदी स्वराज्य स्थापनेच्या कार्यासाठी सुद्धा छत्रपती शिवरायांनी लुटूपुटूच्या लढायांचे खेळ आपल्या सवंगड्यांसोबत खेळले व एवढे मोठे स्वराज्य उभे केले. शरीर प्रकृती तंदुरुस्त ठेवण्यासाठी खेळासारखे दुसरे सुंदर माध्यम नाही. या कार्यक्रमा प्रसंगी ए टू झेड स्कूलचे संचालक संचालिका श्री सुरेंद्र मुनोत सर व सौ सीमा मुनोत मॅडम उपस्थित होते. प्राध्यापक श्रीकांत चिंचखेडकर यांनी विद्यार्थ्यांसाठी स्पोर्ट्स दिनानिमित्त औचित्य साधून अशा प्रकारचे उपक्रम राबवून ते यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल म्हणून सरांचे मनःपूर्वक आभार मानले व ए टू झेड स्कूलचे कार्य हे ए टू झेड विटामिन सारखेच आहे हे आवर्जून सांगितले तसेच यासारखे उपक्रम यशस्वीरित्या बाल वर्ग व विद्यार्थ्यांसाठी त्यांच्यामार्फत राबविले जावेत यासाठी शुभेच्छा दिल्यात. या कार्यक्रमाप्रसंगी सौ राखी आबड, सौ नीलिमा देसरडा मॅडम ,सौ शैला चिंचखेडकर इतर शिक्षक वृंद व मोठ्या संख्येने बाल विद्यार्थी वर्ग व पालक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे कुमारी सुरभी मुनोत यांनी सूत्रसंचालन केले.