महादीप परीक्षेमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किनगाववाडीची गरुड झेप

बदनापूर प्रतिनिधी. बाबासाहेब केकान
मौजे किनगाव वाडी तालुका अंबड जिल्हा जालना. एक छोटेसे पंधराशे ते सोळाशे लोकसंख्या असलेले संपूर्णतः राजपूत समाजाची वस्ती असलेली गाव आणि याच गावात ज्ञानदानाचे कार्य करते ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळा.
शाळेमध्ये तब्बल 234 विद्यार्थी ज्ञानग्रहण करतात. शाळेमध्ये 11 शिक्षक ज्ञानदानाची कार्य करतात. परिसरातील लोणार भायगाव व कौचलवाडी या गावचे विद्यार्थी सुद्धा या शाळेमध्ये दाखल आहेत.
माननीय जिल्हाधिकारी .श्रीकृष्ण पांचाळ साहेब जिल्हा जालना यांच्या संकल्पनेतून पूर्ण जिल्हाभर महादीप या परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. ही परीक्षा केंद्र स्तर, तालुकास्तर व जिल्हा स्तर या प्रकारामध्ये आयोजित केली होती.
तालुकास्तरावरून प्रत्येक इयत्तेतील प्रथम क्रमांकाचे 10 विद्यार्थी जिल्हास्तरीय परीक्षेसाठी पात्र ठरले होते. या शाळेतील तीन विद्यार्थी जिल्हास्तरासाठी पात्र ठरले होते. महादीप परीक्षा मधून जिल्हास्तरावरून प्रत्येक इयत्तेतून पहिल्या दहा विद्यार्थ्यांना श्रीहरीकोटा इस्रो येथे मोफत विमान प्रवासाने जाण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती.
सदरील परीक्षा जिल्हास्तरावर पाच फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आली होती व या परीक्षेचा निकाल 7 फेब्रुवारी 2025 रोजी जाहीर करण्यात आला.
जिल्हा गुणवत्ता यादीमध्ये एकाच शाळेतील तीन विद्यार्थी पात्र होऊन संपूर्ण जालना जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून जिल्हा परिषद प्राथमिक शाळाकिनगाव वाडीने यशाची पताका फडकवली.
सदरील यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक रविंद्र पांडुरंग जामदार यांनी सांगितले की शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच संपूर्ण वर्षातील स्पर्धा परीक्षा यांचे नियोजन केले जाते. व त्याप्रमाणे विद्यार्थ्यांकडून सदरील परीक्षांचा सराव करून घेण्यात येतो.
या अगोदरही या शाळेतील विद्यार्थी एन. एम. एम. एस./ स्कॉलरशिप/मंथन यशस्वी झालेले आहेत.
सदरील यशाची बातमी गावकऱ्यांना समजताच गावातील सरपंच, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व समस्त गावकरी दुसऱ्याच दिवशी शाळेमध्ये दाखल झाले व त्यांनी पात्र विद्यार्थ्यांचा भव्य दिव्य असा सत्कार सोहळा आयोजित केला. होता व गावातील नागरिकांनी विद्यार्थ्यांना रोख पारितोषिके जाहीर केले.
सदरील विद्यार्थ्यांना अंबड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी चव्हाण , रोहिलागड केंद्राचे केंद्रप्रमुख श्रीमंत गंगावणे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
सदरील विद्यार्थ्यांना यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक गायकवाड सरवदे खणके ,. चोले ,श्रीमती पोले , श्रीमती मुंडे , श्रीमती नरवाडे बाबासाहेब केकान राठोड खोजे यांनी परिश्रम घेतले.